अवसरी खुर्द शाळेत सुसज्ज संगणक कक्ष
मंचर, ता. २७ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आयडियल व डिजिटल एज्युकेशन उपक्रमांतर्गत पंचवीस संगणकांची सुसज्ज अत्याधुनिक कक्ष सुरू करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष पोखरकर यांनी दिली.
राज्य शासनाच्या आयडियल शाळा संकल्पनेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक डिजिटल सुविधा आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्याने सुरू झालेल्या कक्षामध्ये २५ संगणक संच, उच्चगती इंटरनेट, ई-डेस्क, ई-पोडियम, डिजिटल स्क्रीन, साऊंड सिस्टिम, स्टायलस पेन, हेडफोन तसेच विविध शैक्षणिक सॉफ्टवेअर व ॲप्सचा समावेश आहे.
या सुविधेमुळे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, स्मार्ट लर्निंग, डिजिटल धडे व इंटरनेटचा प्रत्यक्ष वापर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, डिजिटल इंडिया व ई-लर्निंग उपक्रमांशी सुसंगत अशी ही सुविधा असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
डिजिटल कक्षाच्या प्रारंभप्रसंगी उपशिक्षक अपूर्वा शेटे, वैशाली जाधव, प्रमिला धुमाळ, शैला सांडभोर, ललिता काळे, सोमनाथ एरंडे, शंकर वारे, प्रिया चांगण, विशाल पिंगळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन शिंदे, मनोज ढोणे, शेखर वायाळ, मनोज शिंदे आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
अवसरी खुर्द शाळेत प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्याने सुरू झालेल्या डिजिटल कक्षामुळे विद्यार्थ्यांची डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणात वाढणार असून शिक्षण अधिक आकर्षक, सोपे व परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील डिजिटल दरी कमी करण्यासाठी हे आयडियल सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
-संतोष पोखरकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

