

Avsari Khurd to Get 110 Crore Skill Development Center
Sakal
मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे व मुंबईसारख्या मोठ्या शहरांत न जाता आपल्या भागातच उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होणाऱ्या आविष्कार, नवोन्मेष, ऊर्जन व प्रशिक्षण केंद्राची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.