बारामती - शहरातील खंडोबानगरमध्ये हायवा ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ओंकार आचार्य व त्यांच्या दोन लहान मुली सई व मधुरा आचार्य यांचा दुर्देवी अंत झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने खडबडून जागे होत सोमवारी (ता. 28) दिवसभर हायवा ट्रकवर कारवाई केली. .नागरिकांच्या हायवा ट्रकच्या एकूणच वाहतूकीविषयी कमालीच्या तक्रारी होत्या. वेगाने वाहन चालविणे, परवाना नसलेल्या चालकांकडून अवजड वाहन चालविणे, अनेकदा गाडीला नंबर प्लेट नसणे, सर्वात महत्वाचे म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणे, अतिशय कर्णकर्कश्श हॉर्न वाजवित जाणे अशा तक्रारी होत्या..बारामतीतील भीषण अपघातानंतर जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने चौदा हायवा ट्रकवर कारवाई केली. यामध्ये कागदपत्रे नसणे, क्षमतेहून जास्तची वाहतूक करणे, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणे अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली.स्वताः अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव व विलास नाळे तसेच बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे, प्रदीप काळे, माया निगडे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, बारामती पोलिस ठाण्याचे ओंकार सीताप, स्वाती काजळे, अजिंक्य कदम यांच्यासह पोलिसांच्या फौजफाट्याने रस्त्यावर उतरत ही कारवाई केली..रस्त्यावर सांडणा-या खडी, मुरुमामुळे अपघाताचा धोका....अनेक हायवा ट्रकमधून खडी, मुरुमाची वाहतूक केली जाते. उघडया हायवामधून वाहतूक करताना अनेकदा गतीरोधकांवरुन किंवा खडडयातून गेल्यावर खडी, मुरुम रस्त्यावर पडतो. हायवा ट्रकचालकाला त्याचे काही देणेघेणे नसते. दुचाकीस्वारांसाठी रस्त्यावर सांडणारी खडी व मुरुम अपघाताला निमंत्रण देणारी ठरते. ही वाहतूक करताना रस्त्यावर खडी मुरुम सांडणार नाही याची काळजी घ्यावी अशीही नागरिकांची मागणी आहे..वेळा ठरवून द्याव्यात...हायवा ट्रकसह सगळ्याच अवजड वाहनांच्या वाहतूकीला गर्दीच्या वेळा सोडून इतर वेळा वाहतूकीसाठी द्याव्यात, अशी नागरिकांची प्रमुख मागणी आहे. ही वाहतूक जीवघेणी ठरत असून तातडीने या बाबत निर्णय घेण्याचे नागरिकांचे आवाहन आहे.दहा टनांपर्यंत ओव्हरलोड वाहतूक....सर्रास ओव्हरलोड वाहतूक करणा-या हायवा ट्रकमध्ये आज दहा टनांपर्यंत अतिरिक्त साहित्य भरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. उपप्रादेशिक परिवहन विभाग आता या बाबत पुढील कारवाई करणार आहे. रस्त्यांची वाट लावणा-या या हायवांविषयी कमालीच्या तक्रारी आहेत..कारवाईत सातत्याची मागणी....अपघातानंतर एक दिवस कारवाईचा फार्स करण्यापेक्षा वर्षभर नियमित कारवाई व्हायला हवी, यातील गैरप्रकार थांबवून नागरिकांच्या जिवाला प्राधान्य द्यायला हवे, अशी बारामतीकरांची मागणी आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.