निरगुडसर : अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील एकूण १३ ग्रामपंचायतींना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला..अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्राममर्मी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतीला या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत जवळे यांना आदर्श ग्राममर्मी ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे होते.यावेळी जेष्ठ कृषी जलतज्ञ डॉ.मगर,सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी,उपमुख्य कार्य.अधिकारी विजयसिंह नलावडे,आमदार राहुल कुल,प्रदीप दादा कंद,सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे उपस्थित होते,यामध्ये भव्य ट्रॉफी,भारतीय संविधान, ग्रामगीता व वडाचे एक रोप सन्मान म्हणून भेट देण्यात आले..जवळे गावचे आदर्श सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील,उपसरपंच मनीषा टाव्हरे,चंद्रकला गायकवाड,संगीता साबळे,अंगणवाडी सेविका शालन सोनवणे,संगीता वाळुंज संगणक परिचालीका सुजाता पोखरकर,ग्राम रोजगार सेवक भूपेंद्र वाळुंज, ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांनी गावच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी आंबेगाव पंचायत समितीचे सागर कांबळे साहेब उपस्थित होते..सरपंच वृषाली शिंदे म्हणाले की,गावामध्ये केलेली विकास कामे यामध्ये मिळालेले सर्व ग्रामस्थांचे,सदस्यांचे मिळालेले योगदान,सर्व शासकीय कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व आंबेगाव पंचायत समितीचे सर्व अधिकारी यांचे आभार मानले.कारण काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते व सर्वांनी एकत्रित केलेल्या कामाचा ठसा हे आज आदर्श गाव पुरस्कार मिळाल्याने सर्वांचे साक्षीने उमटलेला आहे हा पुरस्कार जवळे ग्रामस्थांना समर्पित करण्यात येतो..जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत:शिर्सुफळ (बारामती),ससेवाडी(भोर),पाटस (दौंड),झगडेवाडी (इंदापूर), कान्हेवाडी(खेड),काळवाडी (जुन्नर),टिळेकरवाडी (हवेली), मुडावरे(मावळ),कोळवण (मुळशी),गराडे (पुरंदर),विठ्ठलवाडी (शिरूर),सुरवड (वेल्हे). .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.