esakal | भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकापासून दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhidewada

वास्तू जतन करावी
भिडेवाड्यातील कोणत्या खोलीत मुलींची पहिली शाळा सुरू झाली, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ही वास्तू आहे, त्या स्थितीत जतन करून ठेवावी. तिथे महिलांना शिक्षण, प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. तसेच सावित्रीबाईंची वेगवेगळी वैशिष्ट्ये दाखविणारे प्रदर्शनही असावे, असे नितीन पवार म्हणाले.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकापासून दूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून, त्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत तेवती केली, ते ठिकाण म्हणजे भिडेवाडा. या जागेला राष्ट्रीय स्मारकाला दर्जा मिळावा म्हणून गेली २१ वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही त्याला यश मिळालेले नसून, स्मारकाचा मुद्दा प्रलंबित आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांनी एक जानेवारी १८४८ रोजी याच बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली. शाळा स्थापनेला १९९८ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, नितीन पवार यांनी फुलेवाडा ते भिडेवाडा अशी मिरवणूक काढली होती. त्या वेळेपासून हे स्मारक करावे, या मागणीने जोर धरला आहे.

शाळेचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करणारे नितीन पवार म्हणाले, ‘‘सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या या शाळेचे राष्ट्रीय स्मारक होण्यात राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. पुणे महापालिकेने स्मारक करण्याचा ठराव केला. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील पावणेदोन कोटी रुपये भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे भरलेदेखील आहेत. मात्र, त्यानंतर स्मारक होण्याच्यादृष्टीने कोणत्याच सरकारने प्रयत्न केलेले नाहीत.’’

भिडेवाड्यात आता दोन गुंठे जागा राहिली आहे. त्यात जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात आहे. परंतु राज्य सरकारने यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्यांना योग्य तो मोबदला देऊन, ही जागा मिळवली पाहिजे आणि तेथे शक्‍य तितक्‍या लवकर स्मारक उभे केले पाहिजे. गेली २१ वर्षे आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राजकीय नेत्यांनी या प्रश्‍नी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

loading image