कथाकथन, संगीत अन् कवितेतून मनःशांती
रावेत, ता. १६ ः कथाकथन, संगीत आणि कवितेच्या माध्यमातून मन शांत करण्याचा आणि स्वतःकडे पाहण्याचा वेगळा अनुभव उपस्थितांना मिळाला. आरोग्य टिकवण्यासाठी मोठे बदल नव्हे, तर दैनंदिन जीवनातील लहान सवयी निर्णायक ठरतात, असा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. निमित्त होते, शारीरिक व मानसिक आरोग्याशी पुन्हा नाते जोडणारा ‘संभव २०२६’ या कार्यक्रमाचे.
चिंचवडमधील एल्प्रो ऑडिटोरियममध्ये अनुभवाधारित वेलनेस कार्यक्रम शुक्रवारी (ता. १६) उत्साहात आणि सकारात्मक प्रतिसादात पार पडला. ९० मिनिटांच्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील नागरिक, कर्मचारी आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विद्याधर कुंभार म्हणाले, ‘‘आपल्या शरीराला ओळखण्यासाठी वात, पित्त आणि कफ याची माहिती घेतली पाहिजे. डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आहे. मन हे शरीरातील घडामोडींचे लक्षण आहे. तसेच वात, पित्त आणि कफ यांचा शरीरातील विविध घटकांवर परिणाम होतो. याला त्रिदोष म्हणतात. पिझ्झा, बर्गर आणि अजिनोमोटो हे पदार्थ हानिकारक असतात. मनावर ताबा ठेवून त्यावर मात करता येते. प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. साखर आहारात प्रमाणात असावी. गुळामुळे जंत होत असल्याने तो मुलांना देऊ नये. कफ शुद्ध ठेवण्यासाठी अनुपान करावे. शतावरी कल्प हे औषध म्हणून उपयुक्त आहे.’’
साधेपणा आणि सुसंगत दिनचर्या
कवी रवी कुंभार यांनी कवितांच्या माध्यमातून वात, पित्त आणि कफ यांची लक्षणे सांगितली. गायक अनिरुद्ध देवकर आणि किरण सावंत यांनी गायनातून महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्याने त्यानुसार आहार, दिनचर्या आणि विचारसरणी असणे आवश्यक आहे. तणाव, मानसिक थकवा आणि अस्वस्थता हे आजचे प्रमुख आजार असून त्यावर उपाय म्हणून आत्मजाणीव, साधेपणा आणि सुसंगत दिनचर्या महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रियंका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. गायक अनिरुध देवकर, कवी रवी कुंभार, किरण सावंत, कार्यक्रमाचे दिग्दर्शक स्मिता कुंभार आणि की बोर्ड वादक राशिद शेख यांनी सहभाग घेतला.
डॉ. विद्याधर कुंभार यांचा सल्ला
- आहारामध्ये बदल करून बरेच आजार दूर करता येतात
- मुलांना आले, तुळशी, कोमट पाणी द्यावे
- दररोज अंडी देऊ नयेत
- मोड आलेली कडधान्य द्यावीत, ती पचण्यासाठी जड असली तरी पोषक असतात. ती भाजून खाल्ल्याने पचण्यास मदत होते
- दुधात सुंठ मिसळून सेवन केल्यास फायदा होतो
- वात, पित्त आणि कफ यांचा समतोल राखणे शरीरासाठी फायदेशीर
- आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून जीवन जगण्याची शास्त्रशुद्ध पद्धत
नागरिकांच्या भावना...
- ‘संभव २०२६’ हा शैक्षणिक व प्रतिबंधात्मक स्वरूपाचा उपक्रम
- कॉर्पोरेट कर्मचारी, संस्था तसेच सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी उपयुक्त
- मानसिक शांतता मिळाली
- व्याख्यानापेक्षा अनुभवावर आधारित संवादात्मक स्वरूपामुळे कार्यक्रम वेगळा व परिणामकारक ठरला
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

