आयुर्वेद ब्रँडला वाढविणारे ‘रेशमोना’

आरोग्याची योग्य काळजी हा प्रत्येकासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात स्कीन केअरला अधिकच महत्त्व दिले जाते.
Mona pandit
Mona panditSakal
Updated on

पुणे - आरोग्याची योग्य काळजी (Health Care) हा प्रत्येकासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात स्कीन केअरला (Skin Care) अधिकच महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. या सर्वांत केमिकलविरहित उत्पादनांचा वापर करण्यास पसंती असते. त्यामुळे आयुर्वेदिक (Ayurvedic) उत्पादनांना प्राधान्य दिले जाते.

ग्राहकांची वाढत्या पसंतीमुळे अनेक कॉस्मेटिक कंपन्यांनी आयुर्वेदिक उत्पादनांकडे मोर्चा वळविला आहे. त्यातून एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. या सर्वांत ‘रेशमोना’ (RESHMONA) या पुण्यातील स्टार्टअपने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शरीराचा महत्त्वाचा अंग असलेल्या त्वचेची निगा राखण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादने तयार करण्याचे काम हे स्टार्टअप करते. उत्पादन निर्मितीसाठी डेटा विश्‍लेषण, मागणीची स्थिती आणि मशिन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

१९८४ मध्ये येथील आयुर्वेदिक वैद्य डॉ. सतीश डी. पंडित यांनी त्यांच्या आयुर्वेदिक औषधांवरील विश्‍वासातून ‘रेशमोना’ चे उत्पादन सुरू केले होते आणि यासाठी त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर केला होता. डॉ. पंडित यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी मोना पंडित यांनी या स्टार्टअपची धुरा सांभाळली. एखादे उत्पादन निर्माण करणे सोपे, पण त्याची विक्री करणे मुश्‍कील असते. मात्र, रेशमोनाने नव्या अवतारात आणलेली उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस पडली. त्यामुळे नवनिर्माण केलेल्या ‘रेशमोना’ स्टार्टअपला दोन वर्षांतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून नागरिकांची आयुर्वेदिक उत्पादनांना असलेली पसंती स्पष्ट होते, असे मोना यांनी सांगितले. मोना यांनी कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पुणे विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे. १५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी विपणन क्षेत्रात काम केले आहे.

सोशल मीडियाचा वापर...

स्टार्टअपने तयार केलेल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र बजेट असतेच असे नाही. या स्टार्टअपची देखील तीच स्थिती होती. त्यामुळे मोना यांनी सोशल मीडियाचा वापर करून त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात त्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com