डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांची जागतिक कामगिरी

डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांची जागतिक कामगिरी
Published on

लोणावळा, ता. १: मावळातील आयुर्वेद वाचस्पती डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी यांनी जागतिक स्तरावर आयोजित ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कुलकर्णी यांनी आयर्नमॅन किताब मिळवत मावळ तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवले आहे.
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सलग १.९ किमी समुद्रात पोहणे, त्यानंतर ९० किमी सायकल चालवणे आणि शेवटी २१.१ किमी धावणे हे सर्व टप्पे ठराविक वेळेत पूर्ण करावे लागतात. आठ तास ३० मिनिटांच्या आत हे आव्हान पूर्ण करणे आवश्यक असते. दरवर्षी जगातील सहा खंडांमध्ये विविध देशांत या स्पर्धा पार पडतात.
नोव्हेंबर २०२५ मध्ये गोव्यातील पणजी तसेच फेब्रुवारी २०२६ मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या स्पर्धेत कुलकर्णी यांनी कामगिरी केली. तळेगाव येथे डॉक्टर म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांनी प्रशिक्षण घेतले. नियमित सराव, योग्य आहार, मानसिक तयारी आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले. गिर्यारोहणाचा पूर्वानुभव आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा या स्पर्धेत त्यांना मोठा फायदा झाला अशी प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com