पुण्यातील तीन आयुर्वेदिक औषधांचे परवाने रद्द

पुण्यातील तीन आयुर्वेदिक
औषधांचे परवाने रद्द
Published on

पुणे, ता. ११ : राज्यातील आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करणाऱ्या ४३४ आयुर्वेदिक औषध उत्‍पादक संस्थांची तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनामार्फत (एफडीए) राबवण्यात आली. यादरम्यान नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या १० आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्‍यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून त्‍यामध्ये पुण्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.
बारामतीमधील कृष्णा हर्बल, लष्‍कर परिसरातील कालिदास गांधी व जेजुरी एमआयडीसी येथील इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. यांचे परवाने रद्द केले आहेत. त्‍यामध्‍ये तांत्रिक मनुष्यबळ, चांगल्या उत्पादन पद्धती, गुणवत्ता नियंत्रण विभाग, बॅच उत्पादन अभिलेख आणि कच्च्या मालाच्या चाचणी नोंदी इत्यादी विविध बाबींची कसून छाननी करण्यात आली. नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना यापूर्वी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्‍याचबरोबर आता केलेल्‍या तपासणीमध्‍ये उत्पादन व चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री/उपकरणे उपलब्ध नसणे, अस्वच्छ व निकषांचे पालन न करणारे उत्पादन परिसर, बॅच उत्पादन अभिलेख, कच्च्या मालाच्या नोंदींचा अभाव व तफावत आदी बाबी आढळून आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com