रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे आयुर्वेदीक औषध 'शतप्लस' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurvedic Syrup

रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे आयुर्वेदीक औषध 'शतप्लस'

पुणे - मानवी रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे शतप्लस हे आयुर्वेदीक औषध बीव्हीजी लाईफ सायन्सच्या वतीने विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना रूग्णांवरील वैद्यकीय चाचण्यांमध्ये हे औषध उपचारासाठी फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे, असा दावा बीव्हीजीचे संस्थापक संचालक हणमंतराव गायकवाड यांनी केला आहे.

शतप्लस आयुर्वेदिक औषधाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी नायडू हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ.सुधीर पाटसुटे, बीव्हीजी ग्रुपच्या बीव्हीजी लाईफ सायन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. पवन के. सिंघ आणि वैद्य हरिष पाटणकर आदी उपस्थित होते. कोरोना साथीच्या काळात हे औषध म्हणजे निरोगी शरीरासाठी आणि चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण आहे, असा आशावादही गायकवाड यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईपेक्षा स्थानिक महाविद्यालयात प्रवेश निश्‍चिती

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डमधील गर्दीला बसणार वेसण; ओळखपत्राशिवाय 'नो एन्ट्री'

औषधाची वैज्ञानिक सिद्धता...

- रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे औषध म्हणून एफडीएची मान्यता

- पुण्यातील डॉ. नायडू रूग्णालय येथे ६० आणि जयपुरच्या राष्ट्रीय आयुर्वेदीक संस्थेत ९० लोकांवर कोविड संबंधी वैद्यकीय चाचणी

- संबंधीत चाचणीत कोरोना बाधितातील विषाणू संख्येत ९४ टक्के घट झाल्याचा दावा

- आयुष मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर

- रोगप्रतिकारशक्ती संतुलीत ठेवणारे हे औषध इतरही रोगांवर उपयोगी असल्याचा दावा

कोरोना उपचारांमध्ये अनेक घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कोणत्याच अमूक एका औषधाने कोविडवर मात करता येते असे म्हणता येत नाही. मात्र, अशा परिस्थितीत शतप्लस हे औषध रोग प्रतिकारक शक्ती वाढवून रूग्णाच्या उपचारांमध्ये सहाय्यकारक म्हणून महत्वाची भूमिका बजावते आहे.

- डॉ.सुधीर पाटसुटे, अधिष्ठाता, नायडू रूग्णालय.

शतप्लस ट्रीटमेंट ग्रुपमध्ये स्टँडर्ड ट्रिटमेंट ग्रुपच्या तुलनेत रोग प्रतिकारक शक्ती सुचकांवर अर्थात इम्युनिटीइंडीकेटर्सवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. शतप्लस हे वैद्यकीय दृष्ट्या वैध आयुर्वेदिक औषध असून विषाणूजन्य संक्रमणापासून ते संरक्षण करते आणि लढायला मदत करते. सहाय्यक उपचार म्हणून संसर्गजन्य रोगापासून बचाव आणि संरक्षणात शतप्लस महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

- डॉ. पवन के. सिंघ

Web Title: Ayurvedic Medicine Shatplus Balances The Immune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top