
Ayush Komkar murder case Bandu Andekar court statement
esakal
Ayush Komkar Murder Case: पुण्यातील नाना पेठेत घडलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींना काल (मंगळवार) पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांच्यासह सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश आहे. या खटल्यातील युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांचे दावे यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. कोर्टात बंडू आंदेकर यांनी केलेल्या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.