
पुणे : संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देणारे एकत्रित ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) आणि ‘महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजने’चे (एमजेपीजेएवाय) ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ आता मोबाईलवर डिजिटल स्वरूपात काढता येणार आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यानुसार कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.