कोल्हापूरः आजरा तालुक्यात ४७ वनराई बंधारे पूर्ण

कोल्हापूरः आजरा तालुक्यात ४७ वनराई बंधारे पूर्ण
Published on: 

आजरा तालुक्यात
४७ वनराई बंधारे पूर्ण
--------------
अॅग्रोवन वृत्तसेवा
आजरा, जि. कोल्हापूर ः पावसाने ओढ दिल्याने आजरा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी अडविण्यासाठी प्रशासनाकडून वनराई बंधारे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील ५१ गावांमधील ओढे व नाल्यांवर आतापर्यंत ४७ वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले आहेत. तालुक्यात एकूण १४९ बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
ऑगस्टनंतर तालुक्यात पाऊस न झाल्याने शेतीच्या अडचणी वाढल्या आहेत. माळरानावरील पिकांचे नुकसान झाले असून, भात पीकही करपले आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना नदी आणि विहिरींमधून पाणी उपसा करावा लागत आहे.
या परिस्थितीत पाणी अडवून त्याचा शेतीसाठी उपयोग व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने वनराई बंधारे उभारण्यावर भर दिला आहे. वनविभाग, महसूल विभाग आणि पंचायत समितीसह संबंधित यंत्रणांच्या मदतीने हे काम सुरू आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध होण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com