
Pune Alert: पुण्यातील बाबा भिडे पुल वाहतूकीसाठी बंद
पुण्यातील बाबा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आला आहे. नदी पत्रातील विसर्ग वाढवल्यामुळे भिडे पुलाला लागून पाणी लागल्यामुळे वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून आज सकाळी 10 वाजता 13 हजार 981 क्यूसेक करण्यात आला आहे. यामुळे भिडे पुलावरुन पाणी वाहू लागल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नदी पात्रा लगतचा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुठा नदी पात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. पुण्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे नदी पत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.