पुणे - नारायण पेठेचा भाग मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी पादचारी पूल उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेला बाबा भिडे पूल २० ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. तर गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोसेवा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरु राहावी अशी सूचना महामेट्रोला केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.