

लोगो : जनता बँक व्याख्यानमाला
---
PNE26W52394
सोलापूर : ‘बाबूजी आणि मी’ कार्यक्रमात गीत सादर करताना श्रीधर फडके व अन्य सहकारी.
--------------
सुमधुर गीतांनी सोलापूरकरांची सायंकाळ मंत्रमुग्ध
संगीतकार श्रीधर फडके यांच्या ‘बाबूजी आणि मी’ कार्यक्रमासाठी हुतात्मा हाउसफुल्ल
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : अवीट चालींची सुमधुर गीते, स्वरगंधर्व बाबूजी अर्थात संगीतकार सुधीर फडके यांच्या रम्य आठवणी आणि ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांचे गायन, अशा त्रिवेणी संगमाने मंगळवारची सोलापूरकरांची सायंकाळ मंत्रमुग्ध झाली.
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात बौद्धिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २२) तिसऱ्या दिवशी श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांचा ‘बाबूजी आणि मी’ हा कार्यक्रम झाला. प्रारंभी संगीतकार फडके यांचा सन्मान बँकेच्या संचालिका चंद्रिका चौहान यांनी केला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक पुरुषोत्तम उडता, विष्णू मोंढे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, डॉ. हर्षल डंबळ, प्रमोद भुतडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सरव्यवस्थापक मकरंद जोशी, सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, संचालिका गौरी आमडेकर, सरव्यवस्थापक मकरंद जोशी, सहायक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, रमेश मामड्याल, मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ खुने, पवन रणसुभे, विनायक कुरापाटी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात संगीतकार फडके आणि सहकारी गायकांनी ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘देवाचिये द्वारी’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘मी राधिका’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘सांज ये गोकुळी’, ‘गुरू एक जगती त्राता’ अशी एकाहून एक मधुर गीते सादर केली. या सादरीकरणातील अनेक गीतांना सोलापूरकरांनी टाळ्यांची दाद देत ‘वन्स मोअर’ दिला. यावेळी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बाबूजी उपाख्य सुधीर फडके यांनी ५० वर्षांपूर्वी गायिलेल्या ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या गीताची रेकॉर्डिंग सोलापूरकरांना ऐकवली. श्रीधर फडके यांच्यासमवेत शिल्पा पुणतांबेकर, भाग्यश्री काजरेकर यांनीही गीते सादर केली. तर मेघना अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमात तबल्यावर तुषार आग्रे, बासरीवर आदित्य गोगटे, सिंथेसायझरवर सिद्धार्थ सूर्यवंशी, तालवाद्यावर नंदकुमार रानडे यांनी साथसंगत केली. प्रितीविंध्य खटावकर आणि पूनम बोडा यांनी सूत्रसंचालन केले.
----------
चौकट
सुशील कुलकर्णींच्या व्याख्यानाने आज समारोप
जनता बँकेच्या बौद्धिक व्याख्यानमालेचा बुधवारी समारोप होणार आहे. शेवटच्या दिवशी सुशील कुलकर्णी यांचे ‘आजचा खरा झेन झी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.