
पुणे : सरकारला तुमच्या शेतकरी आंदोलनाची भीती का वाटत नाही, याच्या मुळाशी गेले पाहिजे. सरकारला आंदोलनापेक्षा मताची भीती वाटते. शेतकरी विभागला जाऊ नये, यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला.