बीकेबीएन रस्त्याने प्रवास करताय का? मग ही बातमी नक्की वाचा

राजकुमार  थोरात
Tuesday, 20 October 2020

इंदापूर व बारामती तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर (बीकेबीएन) रस्त्यावरील पुलांची दुरावस्था झाली असून, पुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांनी प्रवास करताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

वालचंदनगर : इंदापूर व बारामती तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर (बीकेबीएन) रस्त्यावरील पुलांची दुरावस्था झाली असून, पुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांनी प्रवास करताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इंदापूर तालुक्यातील बीकेबीएन रस्त्यावर तावशी, उद्घट, चिखली, निमसाखर, निरवांगी, रेडणीच्या ओढ्यावरती पूल आहेत. या रस्त्यावरील सर्वच पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ओढ्याचे पाणी पुलावरुन वाहत असते. तसेच बीकेबीएन रस्त्याच्या बाजुने नीरा नदी वाहत असल्याने नदीला पूर आल्यानंतर उलट पाण्याचा प्रवाहामुळे पाण्याचा फुगवटा तयार होवून पूराचे पाणी पुलावरुन येते. नीरा नदीला पूर आल्यांतर व इंदापूर, बारामती तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर अनेक वेळा बीकेबीएन रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, बुधवार (ता. १४) रोजी इंदापूर तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे बीकेबीएन रस्त्यावरील पुलावरती खड्डे पडले आहेत. चिखली, निमसाखर व निरवांगीतील पुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, खड्यांमध्ये दुचाकी व चारचाकी गाड्या अडकत आहेत. खड्यांमध्ये पाणी साचले असून, पुलावरुन प्रवास करताना प्रवाशांना खड्डे दिसत नसल्याने गाड्या खड्यामध्ये आदळत आहेत. बीकेबीएन रस्त्यावरुन प्रवास करताना नागरिकांनी  योग्य काळजी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी...
बीकेबीएन रस्त्याच्या कामासाठी १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या पुलावरील धोकादायक खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी निमसाखरचे उद्योजक विनाेद रणसिंग यांनी केली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of BKBN road