esakal | पुण्यात अत्यवस्थ रुग्णांचे नातेवाईक धावताहेत, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

cv.jpg

अत्यवस्थ कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांची होतेय दमछाक. 

पुण्यात अत्यवस्थ रुग्णांचे नातेवाईक धावताहेत, कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : रात्र पहात नाही, की अपरात्र. धो-धो कोसळणाऱया पावसाची पर्वा नाही की, वेळ-काळ पहाणेही शक्यच नाही. कारण... एकच, कोरोनाचा संसर्ग झालेल्या माझ्या, आपल्या माणसाचे प्राण मला वाचवायचेत... त्यासाठी हवंय ते एंजेक्शन! ते मिळविण्यासाठी अत्यवस्थ रुग्णाचे नातेवाईक धावतायंत... ते पळतायं शहरभर.

शहरात कोरोनाचा विषाणूंचा उद्रेक वाढत आहे. सध्या शहरात 14 हजारांवर कोरोनाबाधीत रुग्ण उपचारासांठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यापैकी आठशे रुग्ण अत्यवस्थ आहेत. या आधीपर्यंत कोरोनाबाधीतांना आँक्सिजन बेड किंवा व्हेंटीलेटर मिळण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावा-धाव करावी लागत होती. पण, गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेने उचललेल्या पावलांमुळे बेड मिळत आहेत. रुग्णाची आँक्सिजनची गरज पूर्ण होत. मात्र, या दरम्यान, उपचारासाठी लागणारे रॅमडेसिव्हीर आणि टोसिलीझ्युमॅब हे इंजेक्शन डॉक्टरांना मिळवून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईक अक्षरशः जीवाच्या आकांताने धावपळ करत आहेत. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून रात्री-अपरात्री पुण्यात येतात. औषध विक्रेत्यांकडून हे इंजेक्शन घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

अत्यवस्थ कोरोनाबाधीत रुग्णांवर प्रभावी ठरत असलेले रॅमडेसिव्हीर आणि टोसिलीझ्युमॅब या जीवरक्षक इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांची धडपड आता बघवत नाही, अशी भावना काही औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अत्यवस्थ रुग्णाचा नातेवाईक संदीप कोरडे म्हणाले, “टोसिलीझ्युमॅब इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिले होते. रुग्णालयाच्या औषध दुकानात ते मिळाले नाही, पण शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या औषध दुकानांमध्ये फिरूनही हे मिळत नव्हते. एका बाजूला पाऊस पडतोय आणि दुसरी हे इंजेक्शन मिळण्यासाठी फरत होतो. अखेर 42 हजार रुपयांना हे इंजेक्शन मिळाले.”  

या बाबत ‘केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन आँफ पुणे डिस्ट्रीक्ट’चे (सीएपीडी) सचिव अनिल बेलकर म्हणाले, “टोसिलीझ्युमॅब इंजेक्शन हॉस्पिटलमधील डॉक्टर मोठ्या प्रमाणात लिहून देत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर ‘सीएपीडी’ या इंजेक्शनचा पुरवठा करत आहेत. मात्र, कंपनीकडून मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे वितरणात अडथळे निर्माण होत आहेत.”

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) एस. बी. पाटील म्हणाले, “कोरोना रुग्णांवर टोसिलीझ्युमॅब प्रभावी ठरत नाही, असे हे इंजेक्शन उत्पादन करणाऱया कंपनीनेच सांगितले आहे. तसेच, रॅमडेसिव्हीर या इंजेक्शनचा पुरेसा साठा सध्या शहरात आहेत. त्यामुळे प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत हे औषध उपलब्ध होईल.”

डॉ. कपील झीरपे म्हणाले, “तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच रॅमडेसिव्हीर आणि टोसिलीझ्युमॅब ही इंजेक्शन दिली पाहिजे. रोगाच्या कोणत्या टप्प्यावर हे द्यायचे, ते डॉक्टरांनीच ठरवावे. त्यामुळे योग्य रुग्णापर्यंत ते पोचेल. तसेच, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे इंजेक्शन देणे धोकादायक आहे.” 

कोरोनाबाधीतांवर उपचासाठी अत्यवश्यक औषधे आणि इंजेक्शन यांचा आढावा घेतला. त्यात काही इंजेक्शनचा तुटवडा असलेल्याच्या तक्रारी समोर आल्या. ते इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- सौरभ राव, विभागिय आयुक्त, पुणे
 

loading image
go to top