बारामतीत भर दुपारी दोन लाखांची बॅग चोरट्यांनी लांबवली

बारामतीत भर दुपारी दोन लाखांची बॅग चोरट्यांनी लांबवली
Updated on

बारामती : लक्ष विचलित करत दुचाकीवरील दोन लाखांची रोकड असलेली बँग काल अज्ञात चोरट्याने भर दुपारी लांबवली. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भिगवण चौकात भर दुपारी बॅग लांबवण्याच्या प्रकाराने पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अंगावर खाज येईल अशी पावडर टाकून महालक्ष्मी ऑटोमोटीव्हजच्या कर्मचा-याची अडीच लाखांची रक्कम चोरट्यांनी भिगवण चौकातूनच लांबवली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा दोन लाखांची बँग चोरुन नेण्याचा प्रकार घडला. भर दुपारी अशा चो-या करताना चोरट्यांना भीतीच वाटेनाशी झाल्याचे हे निदर्शक असल्याची आज शहरात चर्चा होती.  

उदयसिंह संपतराव देवकाते (रा. नीरावागज, ता. बारामती) हे बुधवारी (ता. 24) भिगवण चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आले होते. बँकेच्या कर्ज प्रकरणाबाबत त्यांनी नीरा वागज येथील वाघेश्वरी सोसायटीचे सचिव महादेव कुंभार यांना दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले होते. त्या नुसार त्यांच्याकडून ही रक्कम देवकाते यांनी ताब्यात घेत एका बॅगेत ठेवली. बॅंकेतून खाली येत त्यांनी दुचाकीला बॅग अडवली. 

महात्मा गांधी बालक मंदिराजवळ तेथील टरबूज विक्रेत्याने तुमचे पैसे पडले असल्याचे सांगितले. त्यामुळे दुचाकी बाजूला लावत ते खाली उतरले असता पाठीमागे रस्त्यावर 50 रुपयांच्या दोन व दहा रुपयांच्या तीन नोटा पडलेल्या दिसल्या. या नोटा गोळा करण्याच्या नादात दुचाकीला अडकवलेली दोन लाखांची बॅग अज्ञात चोरट्याने काही क्षणात लंपास करत पळ काढला. या बाबत शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु झाला आहे. 

पथक निर्मितीची आवश्यकता...
बारामतीत उपविभागीय पोलिस अधिकारी व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे पथक होते. अनेकदा अशा चो-यांसह क्लिष्ट प्रकरणात गुन्हेगार शोधून काढण्यासाठी या पथकांची मदत होत होती. कालांतराने ही पथके बरखास्त झाली. बारामती क्राईम ब्रांचची मध्यंतरी स्थापना झाली, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने नेत्रदीपक कामगिरीही केली. मात्र नंतरच्या काळात हे पथकही बरखास्त झाले. बदलत्या परिस्थितीत आता नव्याने या दोन पथकांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com