
पुणे - कर्वेनगर परिसरात असलेल्या एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नृत्य शिक्षकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. आरोपी शिक्षक असूनही त्याने हा गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे आरोपी जामीन मिळण्यास पात्र नाही, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्याचा आदेश दिला.