Pune Crime : येरवडामधील लघुशंका प्रकरणातील दोघांच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी

आलिशान गाडीतून येताना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर थांबून केली होती लघुशंका.
sakal
Gaurav AhujaGaurav Ahuja
Updated on

पुणे - आलिशान गाडीतून येताना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर थांबून लघुशंका केल्याप्रकरणी दोघा आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या १७ मार्चला न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने मंगळवारी गौरव आहुजा याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर, त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये या दोघांनी शुक्रवारी रात्रभर पार्टी केली. त्यानंतर आलिशान गाडीतून येताना शास्त्रीनगर चौकात रस्त्यावर मधोमध थांबून लघुशंका आणि अश्लील कृत्य केले. या प्रकरणी गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली होती.

भाग्येश ओसवाल याला सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर, गौरव आहुजाच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती. गौरव याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

सुनावणीनंतर न्यायालयाने गौरवची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या दोघांना आज जामीन मिळालेला नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com