तळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलपोळा

तळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरा

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांना दिला. बैलांचे औक्षण करून यावेळी पूजा करण्यात आली.

येथील श्रीनाथ बैलगाडा मालक- चालक संघटना तसेच स्वयंभू मोरया प्रतिष्ठान यांच्यातर्फे तसेच सर्व शेतकऱ्यांच्यातर्फे साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. कोठेही बैलांची मिरवणूक काढलेली दिसली नाही. बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी रमेश भुजबळ, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, मनोज केदारी, सुभाष ढमढेरे, प्रतीक ढमढेरे, विशाल राऊत, अक्षय ढमढेरे, अमोल ढमढेरे , विठ्ठल नरके, माणिक नरके , रामभाऊ भुजबळ , दादाभाऊ शिनलकर, अतुल सिनलकर आदी बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. दरम्यान, गेली दोन वर्ष कोरोना आणि आता लंपी आजार यामुळे साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.