मिरवणुकीतील वादातून दोन गटांत हाणामारी

मिरवणुकीतील वादातून 
दोन गटांत हाणामारी
Published on: 

सासवड, ता. १३ : बैलपोळ्याच्या मिरवणुकीतील वादातून पवारवाडी (ता. पुरंदर) येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. सासवडजवळील चंदनटेकडी येथील मंदार पवार यांच्या कार्यालयात ११ ऑक्टोबरला रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणात तन्मय प्रल्हाद पवार (वय २०, रा. पवारवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ते व आर्यन पवार मंदार पवार यांच्या ऑफिसमध्ये असताना दत्तात्रय पवार, गौरव संजय पवार, आशिष ज्ञानदेव पवार, सोहम दत्तात्रय पवार, सार्थक सुनील पवार, आदित्य आशिष पवार आणि सत्यम संपत पवार (सर्व रा. पवारवाडी) यांनी जुन्या भांडणाचा राग धरून लोखंडी सळई, लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हवालदार सय्यद तपास करत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात आशिष ज्ञानदेव पवार (वय ४३, रा. पवारवाडी) यांनी फिर्याद दिली. बैलपोळ्यातील भांडण मिटवण्यासाठी ते दत्तात्रय पवार, सोहम पवार, सार्थक पवार व आदित्य यांच्यासह गेले असता, तेथे उपस्थित आर्यन प्रवीण पवार, प्रवीण महादेव पवार, प्रल्हाद महादेव पवार आणि तन्मय प्रल्हाद पवार (सर्व रा. पवारवाडी) यांनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी गज, कोयता व दगडाने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com