Bajaj Finserv
sakal
पुणे - बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. या मुख्यालयाद्वारे पुणे व परिसरात मिळून सुमारे ४० हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.