bajaj pune marathon
sakal
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर रविवारी (ता. १४) होणाऱ्या ‘सकाळ’ आयोजित बजाज पुणे मॅरेथॉनमध्ये धावपटूंना सुरक्षित प्रवेश मिळावा, यासाठी आयोजकांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मॅरेथॉनच्या दिवशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वाहनांना बंदी राहणार आहे. पायी किंवा रेस-डे शटल बसद्वारे कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.