मोहोळ तालुक्यात शेत रस्त्यांच्या बांधफोडीच्या तक्रारीचे प्रमाण मोठे एका वर्षात अपघातात 749 जणांचा मृत्यू उपाय योजनेची गरज पोलीस निरीक्षक पोवार

मोहोळ तालुक्यात शेत रस्त्यांच्या बांधफोडीच्या तक्रारीचे प्रमाण मोठे एका वर्षात अपघातात 749 जणांचा मृत्यू उपाय योजनेची गरज पोलीस निरीक्षक पोवार

Published on

बाजीराव पोवार
MOH26B03269

अपघातांच्या संख्यांचे प्रमाण घटविण्यासाठी प्रयत्न करणार
पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घेतला पदभार

सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २१ ः मोहोळ तालुक्यात ग्रामीण भागातील शेतरस्ते व बांधफोडी या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत, तर अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. एका वर्षात ७४९ जणांचा अपघातात मृत्यू झाला. याबाबी अतिशय गंभीर असून, यावर सर्व वरिष्ठांच्या व शहरवासीयांच्या मदतीने उपाययोजना करणार असल्याची माहिती मोहोळचे नूतन पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.
मोहोळचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली, त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक पोवार यांनी पदभार घेतला आहे. त्यावेळी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलिस निरीक्षक पोवार म्हणाले, अनेक व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर वाहतुकीला अडथळा होईल असे स्टॅन्ड बोर्ड लावले आहेत. ते त्यांनी काढून घेऊन रस्ता मोकळा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. महिन्यातून एकदा सर्व खाते प्रमुखांची बैठक आयोजित करून शहरातील अडचणीवर काय उपाय योजना करता येतील यावर चर्चा घडवून आणणार आहे.
नगरपरिषदेला कोट्यवधींचा निधी शासनाकडून प्राप्त होतो. मात्र शहरात गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येते, रोगराईचे प्रमाण वाढते त्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करून उपाययोजनांबाबत त्यांना सूचना देणार आहे.
शहरातील व शहराबाहेरून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एखादा अपघात झाला तर कायदेशीर प्रक्रियेला मोठी अडचण होते, अपघातात मरण पावलेल्याचे व जखमीचे कुटुंब उघड्यावर पडते, त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व मोहोळ पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्ग, पालखी मार्ग या ठिकाणी धडक कारवाईची मोहीम येत्या दोन-तीन दिवसांत सुरू करत, वाहने जप्त करणार असल्याचेही पोलिस निरीक्षक पोवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com