पूना गेस्ट हाउसच्या स्नेहमंचातर्फे व्याख्यान

पूना गेस्ट हाउसच्या 
स्नेहमंचातर्फे व्याख्यान
Published on

पुणे, ता. २८ : ‘‘श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व अनेक योद्धे, सेनापती, इतिहासकारांनी वाखाणले आहे. अनेक देशांच्या युद्धविषयक अभ्यासक्रमांत त्यांच्या लढायांचे दाखले दिले जातात. त्यामुळे पराक्रमी व राजकारणकुशल बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका,’’ अशी अपेक्षा व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केली.
पूना गेस्ट हाउसच्या स्नेहमंचातर्फे आयोजित ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी प्रशांत गोऱ्हे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, गौरी गोडबोले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, लेखक शिवप्रसाद मंत्री उपस्थित होते. पूना गेस्ट हाउसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली. अजित कुमठेकर यांनी संयोजन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com