गट नंबर दोन येथील शाळेत बाल आनंदी मेळावा उत्साहात
MLG26B03163
माळीनगर (ता. माळशिरस) : गट नंबर दोन येथील शाळेत बाल आनंदी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित महिला.
......
गट नंबर दोन शाळेत बाल आनंदी मेळावा
......
माळीनगर : गट नंबर दोन (ता. माळशिरस) येथील प्राथमिक शाळा क्रमांक तीनमध्ये बाल आनंदी मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळभाज्या, स्टेशनरी, फळे, थंड पेय, खाण्याचे पदार्थ आदी वस्तूंचे स्टॉल मांडून वस्तू विक्रीचा आनंद घेत व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले. दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे, अजय गिरमे, सर्व संचालक मंडळ, पालक, ग्रामस्थांनी खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. महाळुंगच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, कल्पना काटे उपस्थित होत्या. शाळेच्या महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व माता-भगिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला. मुख्याध्यापिका ललिता नागटिळक यांनी प्रास्ताविक केले. वंदना बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वला देवकाते, वैजिनाथ भोसले, गोविंदा काळे, स्मिता म्हेत्रे, गौरी शिंदे यांनी सहकार्य केले. प्रवीण खरात यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

