

वारसा गणेश मंडळांचा
.......
सामाजिक उपक्रम
राबविण्यावर भर
-------------
श्री बालगणेशोत्सव मंडळ
गडकर आळी गावठाण, सातारा
...............
..........
स्थापना : १९२३
अध्यक्ष : अतिश कदम
उपाध्यक्ष : सचिन शेडगे
.............
शहर परिसरात असणाऱ्या मूळ गावठाणांमध्ये गडकर आळीचा देखील समावेश आहे. गावपण जपत होणाऱ्या बदलांना सामोरे जात गडकर आळीने स्वत:चे वेगळेपण यात्रा, जत्रा, सण, समारंभ, उत्सवांच्या माध्यमातून जपले आहे. यापैकी एक महत्त्वाचा असणारा गणेशोत्सव श्री. बालगणेशोत्सव मंडळ १९२३ पासून वेगळेपणाने साजरा करत आहे.
गणेशोत्सवापुरते एकत्र येण्यापेक्षा कायमस्वरूपी एकत्र राहात समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर या मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भर असतो. ग्रामदैवत पेढ्याचा भैरोबा आणि महालक्ष्मी गडकर आळीची मुख्य ओळख आहे. यात्रेसाठी एकवटणाऱ्या तरुणाईकडे गणेशोत्सव मंडळाची धुरा सोपवत ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन सुरू केले. गणेशोत्सवासह यात्रा कालावधीत रक्तदान शिबिर, अन्नदान, वार्षिक भंडारा, परिसर स्वच्छता, सुरक्षितता यावर येथील तरुणाईचा भर असतो. भव्य मूर्ती आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करत विविध समाजोपयोगी उपक्रमांवर मंडळाकडून जास्तीचा भर देण्यात येतो. मंडळ, युवक, तसेच ग्रामस्थांनी श्रमदानातून डोंगरावरील पेढ्याचा भैरोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचे काम केले आहे. याच परिसरात झाडे लावणे, त्यांचे संवर्धन करणे, पुरातन तळ्याची डागडुजी, सफाई, लावलेल्या झाडांच्या देखभालीसाठी स्वतंत्र पाणी व्यवस्था उभारली आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासह येथे विविध उपाययोजना देखील युवक, ग्रामस्थांकडून राबवल्या जातात. युवक, ग्रामस्थांनी केलेल्या ठोस आणि विकासात्मक कामांमुळे गडकर आळीसह परिसराचा कायापालट होण्यास मदतच झाली आहे. विविध समाजोपयोगी, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गडकर आळीचा नावलौकिक अबाधित ठेवण्यासाठी युवकांसह ज्येष्ठ नागरिक अखंडपणे सक्रिय आहेत.
...........
५०११८ : गडकर आळी मंडळ फोटो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.