
पुणे : वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक चाचण्या, संतुलित आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री अवलंबल्यास महिलांना निरोगी आयुष्य जगणे सहज शक्य आहे. आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास वजन तर नियंत्रणात राहिलंच पण आजारांना प्रतिबंधही घालणे शक्य होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी केले.