

During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Sakal
मंचर : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला माजी उपमुख्यमंत्री (स्व.) अजित पवार यांनी मोठी चालना दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेल्या विविध विकासकामांच्या मागण्या त्यांनी तत्परतेने मार्गी लावल्या. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर ( डिंभे धरण ) उजवा-डावा कालवे, घोड, मीना नदी व वेळनदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, भीमाशंकर परिसर विकास, आदिवासी भागातील अद्ययावत आश्रमशाळा इमारती,वीज उपकेंद्र, तसेच तांबडे मळा येथील २०० खाटांचे सामान्य रुग्णालय यांसारखी महत्त्वाची कामे साकार झाली. त्यांचे हे योगदान जनतेच्या कायम स्मरणात राहील. आज त्यांची उणीव सातत्याने जाणवते, असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले.