झाडाचे संवर्धन करून जपल्या वडिलांच्या स्मृती

झाडाचे संवर्धन करून जपल्या वडिलांच्या स्मृती

Published on

वडगाव निंबाळकर, ता. ५ : कुरणेवाडी (ता. बारामती) येथील जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने व पोलिस हवालदार संतोष मदने यांचे वडील बाळासाहेब महादेव मदने यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम सगोबावाडी येथील राहत्या घराजवळ पार पडला. पारंपरिक रूढींना छेद देत मदने कुटुंबीयांनी अस्थी आणि राख नदीत विसर्जन न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, नदी प्रदूषण टळावे या उद्देशाने अस्थी व राख पाण्यात न विसर्जित करता पणदरे विकास मंच सावित्रीबन येथे वडाचे झाड लावून त्या झाडाच्या बुंध्यात टाकण्यात आल्या. वडाचे झाड बाळासाहेब मदने यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून जपले जाईल आणि वाढविले जाईल असा संकल्प मदने बंधूंनी केला.
यावेळी महेंद्र माने, बापूराव गोरगल, संतोष शेलार, संभाजी चव्हाण, भाऊसाहेब मदने, पुष्कराज गायकवाड, संभाजी गोरगल, धोंडिबा खोमणे, महेश जाधव, बापूराव मदने, नवनाथ वाबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com