माळेगाव - छत्रपती कारखान्याचे गतवैभव निर्माण करण्याची धमक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आहे. तेथील तीस हजार पेक्षा अधिक सभासदांनी पवारांवर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी पॅनेल निवडून दिला. वास्तविक छत्रपतीची अर्थिक स्थिती बिकट असतानाही तेथील सभासदांनी अजितदादांवर विश्वास ठेवला. त्या तुलनेत माळेगाव, सोमेश्वर हे सहकारी कारखानेही पवारांच्या नेतृत्वाखालीच राज्यात प्रथम क्रमांकाने ऊस दर देतात.