बालगंधर्वमध्ये ५ मेपासून ‘आमचेही फटकारे’ प्रदर्शन

बालगंधर्वमध्ये ५ मेपासून ‘आमचेही फटकारे’ प्रदर्शन
Published on

पुणे, ता. २८ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरातील नामवंत व्यंग्यचित्रकार आणि चित्रकारांनी आपापल्या शैलीतून रेखाटलेल्या ठाकरे यांच्यावरील चित्र व अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ‘आमचेही फटकारे’ या नावाचे हे प्रदर्शन मंगळवारी (ता. ५) व बुधवारी (ता. ६) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात होणार आहे.
कार्टून कट्टा - महाराष्ट्र व्यंगचित्रकार समूह आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यात देशभरातील १२० चित्रकारांनी रेखाटलेली निवडक २०० चित्रे व अर्कचित्रे पाहायला मिळणार आहेत. यात आर. के. लक्ष्मण, मंगेश तेंडुलकर, मारिओ मिरांडा आदी व्यंग्यचित्रकारांचा समावेश आहे. प्रदर्शनातील दोन्ही दिवस निमंत्रित चित्रकार व व्यंग्यचित्रकारांची प्रात्यक्षिके आणि चर्चासत्रे होणार आहेत. यात घनश्याम देशमुख, चारुहास पंडित, विनय चानेकर आदी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनादरम्यान कार्यशाळा होणार असून, प्रदर्शन व कार्यशाळा विनामूल्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com