Balasaheb Thorat Calls on Pune to Lead the Fight for Saving Democracy
पुणे : ‘‘पुणे तत्वज्ञानाच्या विचारांचे केंद्र कायम राहिलेले आहे. समाजात चर्चा होऊन चुकतेय कुठे हे पाहणं, चुकत असेल तर त्यावर बोट ठेवून ते दुरुस्त करायला लावणे ही भूमिका पुणेकरांनी पूर्वी स्पष्टवक्तेपणाने घेतली आहे. पुणेकर मंडळी जागरूक आहेत. आता देशातील लोकशाही धोक्यात आहे. ही लोकशाही वाचवण्यासाठी पुण्याने पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. ते बालगंधर्व कलादालन येथे आयोजित ‘लोकशाहीची हत्या?, वोट – चोरी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते रविवारी झाले त्यावेळी ते बोलत होते.