नागठाणे साहित्य संमेलन विशेष
बालसाहित्य कट्टा ठरला मुलांसाठी पर्वणी
उत्स्फूर्त प्रतिसाद; दिग्गज साहित्यिकांकडून मुले अन् पालकांना कानमंत्र
सुनील शेडगे ः सकाळ वृत्तसेवा
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा), ता. ४ : मोबाईल अन् सोशल मीडियाच्या दुनियेतून बाजूला पडत मुलांनी सकस, दर्जेदार पुस्तके वाचवीत, लेखनासारख्या छंदात स्वतःला गुंतवून घ्यावे, असा मोलाचा दिग्गज बालसाहित्यिकांनी दिला.
यंदाच्या साहित्य संमेलनात बालसाहित्य वाचन कट्ट्याची संकल्पना राबविण्यात आली. ती मुलांसाठी पर्वणी ठरली. नेटके आयोजन अन् त्याला विद्यार्थी, पालक वर्गाकडून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद संस्मरणीय ठरला. या कट्ट्याला कवी गिरीश बाल-कुमार वाचक मंच असे नाव देण्यात आले. या मंचावर ज्येष्ठ बाल साहित्यिक ल. म. कडू, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड, डॉ. संगीता बर्वे, गणेश घुले, संदीप वाकचौरे या बालसाहित्याच्या क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या नामांकित लेखकांना आमंत्रित करण्यात आले. त्यांनी लेखन, वाचनाबाबत दिलेले कानमंत्र हे विद्यार्थी, पालकवर्गासाठी मोलाचे ठरणारे होते. या मंचावर जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांनी आपल्या कविता अन् कथांचेही प्रभावी सादरीकरण केले.
मंचाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, डॉ. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींच्या उपस्थितीत झाला. केंद्र सरकारचे शिक्षण सचिव अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, शबनम मुजावर आदींनी भेट देऊन या अनोख्या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, सचिन माने, प्रतिभा चौगुले, सागर कांबळे, सुरेश जाधव, संदीप धायगुडे, संदीप संकपाळ, अलका दुधागावकर, जयमाला चव्हाण, रेहाना भालदार, दीपिका शिंदे, योगिता बंडगर आदींनी तीन दिवस यशस्वितेसाठी मोठे परिश्रम घेतले. कलाशिक्षक अनंत लोहार यांनी साहित्यिकांची पेन्सिल स्केच काढून त्यांना भेट दिली.
कोट -
आपण दररोज नवीन पाच शब्द शिकलो, तरी आपली भाषा समृद्ध होण्यासाठी नक्कीच हातभार लागेल. साहित्य संमेलने ही नेहमीच वाचन अन् लेखनासाठी प्रेरणा देत असतात. सातत्याने वाचन केल्यास आपले लेखनही छान होते.
डॉ. संगीता बर्वे,
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका
छायाचित्र ओळी
26B08018
सातारा : मुलांशी संवाद साधताना प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. संगीता बर्वे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

