Pune News : बालभारती पौडफाटा रस्त्यासाठी महापालिका घेणार वन खात्याची परवानगी

बालभारती पौड फाटा रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी महापालिकेकडून वन विभागाची परवानगी घेतली जाणार आहे.
balbharati paud phata road
balbharati paud phata roadsakal
Updated on

पुणे - बालभारती पौड फाटा रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी महापालिकेकडून वन विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज केला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या कामाला पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे हे काम सुमारे दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासनाने थांबविलेले आहे. या कामाविरोधात नागरी चेतना मंचाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालयाने नुकताच निकाल देत ही याचिका फेटाळून लावला आहे.

या रस्त्यासाठी आवश्‍यक महापालिकेने तो विकास आराखड्यात प्रस्तावित करणे, नागरिकांच्या हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घेणे, प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला पर्यावरण आघातचा अभ्यास केला आहे.

महापालिकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्यात आली. तसेच रस्ता करताना महापालिकेला आवश्‍यक वाटल्यास पर्यावरण विभागाची व वन विभागाची परवानगी घ्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

त्यानुसार महापालिकेने काही तज्ज्ञ सल्लागारांशी चर्चा केली. त्यामध्ये महापालिकेला पर्यावरण विभागाकडे पुन्हा परवानगीसाठी अर्ज करण्याची गरज नाही असा अभिप्राय देण्यात आला आहे. तर वन विभागाकडून यापूर्वी परवानगी घेतली आहे, तरीही महापालिकेने याबाबत पुन्हा एकदा वन विभागाची परवानगी घ्यावे असे सल्लागारांनी सांगितले आहे.

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘बालभारती पौड रस्त्यासाठी पर्यावरण विभागाकडून महापालिकेला यापूर्वीच ना हरकत देण्यात आलेली आहे. वन विभागाची परवानगी महापालिका घेणार असून, त्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

अर्थसंकल्पात तीन कोटीची तरतूद

बालभारती पौडफाटा रस्त्यासाठी २५२ कोटी रुपये खर्च येणार आहे. पण महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात केवळ ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल आला तेव्हा महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले होते, त्यामुळे तरतूद वाढवता आली नाही. रस्त्याचे काम सुरु झाल्यास त्यासाठी वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com