

Balbharati’s Operational Scale and Responsibility
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : बालभारतीकडून छापल्या जाणाऱ्या प्रत्येक पुस्तकांमधून महाराष्ट्राची सांस्कृतिक,सामाजिक,भौगोलिक जडणघडण व परंपरांची ओळख करून देताना राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत यासारख्या महत्त्वाच्या बाबींची मांडणी केलेली आहे.मात्र या अजरामर गीतांच्या लेखकांच्या नावाचा विसर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला पडल्याचे काही जेष्ठ अभ्यासकांच्या लक्षात आल्याने,याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.या पुस्तकांमध्ये छापलेल्या कवितांचे लेखकांची नावे कवितांच्या खाली छापली जातात, तसेच महामंडळाच्या कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांची नावे,मुखपृष्ठ करणाराचे नाव,प्रकाशकाचे नाव दिलं जातं यासाठी पुस्तकातील एक पान दिलं जातं,मग या महान अजरामर कला कृतींचे निर्माते महापुरुष रवींद्रनाथ टागोर व गीतकार राजा बढे,ज्यांच्या गीतांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मान्यता देवून त्यांची राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून निवड केली,त्या लेखकांच्या नावाला या पुस्तकात साधी एक ओळ देता आली नाही ही बाब अत्यंत खेदजनक आणि निषेधार्य आहे असल्याची भूमिका काही ज्येष्ठांनी व्यक्त करून याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचा निषेध केला आहे.