बाणेर-बालेवाडीत आज आंदोलन

बाणेर-बालेवाडीत आज आंदोलन
Published on

बालेवाडी, ता. १५ : बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि महाळुंगे परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी शनिवारी (ता. १६) बालेवाडी फाटा चौक, बाणेरमध्ये जनआंदोलन पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्वकल्पना न देता वीज खंडित होणे, उपकरणांचे होणारे नुकसान आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद समाधानकारक नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्यामुळे बाणेर, बालेवाडी, पाषाण रेसिडेंट असोसिएशन (बीबीपीआरए), बाणेर बालेवाडी नागरिक मंच आणि महाळुंगे रेसिडेंट असोसिएशनतर्फे सायंकाळी सहा वाजता हे आंदोलन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com