Balagandharva Rangmandir : बालगंधर्वची जुनी इमारत पाडणार; राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची घोषणा

बालगंधर्व रंगमंदिराची जुनी झालेली इमारत पाडून तेथे नव्याने नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून अडगळीत पडलेला असताना आता मात्र, ही इमारत पाडण्यावर शिक्कमोर्तब झाले आहे.
Balgandharva Rangmandir
Balgandharva RangmandirSakal

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची जुनी झालेली इमारत पाडून तेथे नव्याने नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून अडगळीत पडलेला असताना आता मात्र, ही इमारत पाडण्यावर शिक्कमोर्तब झाले आहे. राज्याने नवे मुख्य सचिव नितीन करीर यांनीच याबद्दल आज (ता. ६) एका कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिराचा नवा आराखडा ठरला असून, पुढील काही दिवसात ही वास्तू पाडली जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रीय बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू म्हणून बालगंधर्व रंगमंदिराची ओळख आहे. राज्यभरातील कलाकारांनाही बालगंधर्वमध्ये त्यांची कला सादर करायला मिळावी अशी तीव्र इच्छा असते. गेल्या ५५ वर्षापासून बालगंधर्व हे पुण्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जडणघडणीचे साक्षीदार आहे.

बालगंधर्व रंगमंदिर जुने झाल्याने तेथे नवे नाट्यगृह बांधले जावे यासाठी महापालिकेतील पदाधिकारी, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ यांची समिती नेमून वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. एप्रिल २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यासंदर्भात सादरीकरण झाले तेव्हा त्यांनी त्यामध्ये महत्त्वाचे बदल सुचविले आहेत.

तसेच मुंबईतील बीकेसीमधील जिओ मॉलची पाहणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिओ मॉलची पाहणी करून येऊन सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले होते. मात्र, नाट्यगृहाच्या ऐवजी मॉल केला जाणार?, कलेऐवजी व्यावसायिक विचार केला जाणार असे यासह इतर मुद्दे उपस्थित झाले.

तसेच कलाकारांमधून विरोधाचा सूर झाल्याने महापालिकेने एक पाऊल मागे घेत मे २०२२ पासून बालगंधर्वच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव बाजूला ठेवला होता. दरम्यानच्या काळात राज्यात राजकीय उलथापालथ झाल्याने बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या मुद्द्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे तसेच नेत्याने प्राधान्य न दिल्याने त्यावरील चर्चा बंद झाली आहे.

मात्र, आता राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बालगंधर्व रंगमंदिरातच पुनर्विकासासाठी जुनी इमारत पाडून नव्याने बांधकाम केले जाईल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात निर्णय प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे.

असा होता प्रस्ताव

नव्या इमारतीमध्ये १ हजार, ५०० व ३०० या क्षमतेचे तीन नाट्यगृह असतील. दोन कला दालने, दोन खुले सभागृह, वाहनतळ याचा समावेश आहे. कला, संस्कृतीचा वारसा सांगणारे सुशोभीकरण, उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, बालगंधर्वचे वैशिष्ट्यपूर्ण व सांस्कृतिक राजधानीचा वारसा सांगणारे प्रवेशद्वार, नैसर्गिक हवा आणि प्रकाश यावरही भर देणारा आराखडा तयार करण्याचे काम दिला जाणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सुधारित पुनर्विकास महापालिका प्रशासनाने सुरू केले होते. मात्र, हा प्रस्ताव अंतिम झालेला नाही.

अशी आहे नितीन करीर यांची भूमिका

‘राज्याचा मुख्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि माझ्या अनेक आठवणी आहेत. आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचा आराखडा देखील ठरलेला आहे. येत्या काही दिवसात ही वास्तू पाडली जाईल.

येते भव्य नाट्यगृह, कलादालन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. तरी बालगंधर्वच्या विकासात आजवर अनेक अधिकाऱ्यांनी योगदान दिले आहे. मात्र आता ही वास्तू पाडली जाणार आहे, यात पुन्हा मला येता येणार नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे हे देखील एक कारण आहे.’

महापालिका अंधारात

नितीन करीर यांनी पुण्यात येऊन बालगंधर्व रंगमंदिराची इमारत पाडणार अशी घोषणा केली. पण याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आमच्या पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच पुनर्विकासाच्या आराखड्यावरही कोणतेही काम सुरु नाही असे सांगितले. त्यामुळे महापालिका प्रशासन याबाबत अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी आहे शक्यता

- पुढील काही दिवसात बालगंधर्व रंगमंदिराचा आराखडा राज्य शासनाकडूनच महापालिकेला मिळणार

- जिओ मॉलची पाहणी केल्यानंतर तयार केलेला आराखडाही अंतिम होण्याची शक्यता

- लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जुनी झालेली इमारत पाडण्याच्या कामास सुरुवात

- त्यापूर्वी सर्व परवानग्या घेतल्या जाणार

- इमारत पाडल्यानंतर पुढील किमान तीन वर्ष नवीन वास्तू तयार होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com