Balgandharva Parking
sakal
पुणे - बालगंधर्व रंगमंदिरातील वाहनतळ हे हॉटेल व्यावसायिकाला वापरायला दिल्याचा प्रकार समोर येऊन सुमारे १५ दिवस उलटून गेले. तरीही पुणे महापालिका प्रशासनाकडून केवळ नोटीस देणे, खुलासा मागविणे असे कागदी घोडे नाचवत आहे. प्रत्यक्षात ठेकेदारावर कारवाई झालीच नाहीच. पण तेथील कामात ही सुधारणा झालेली नाही. प्रशासन ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.