
मधुबन पिंगळे
पुणे : आमचा स्वातंत्र्यलढा हे छुपे युद्ध नाही किंवा कोणत्या परदेशी देशांकडून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून नाही. सामान्य बलुच नागरिकांनी उभा केलेला हा पूर्णपणे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा आहे. त्यामुळे बलुचिस्तानचे स्वातंत्र्य अपरिहार्य आहे, असा विश्वास ‘फ्री बलुचिस्तान मूव्हमेंट’चे सदस्य आणि बलुच मानवाधिकारवादी कार्यकर्ते मीर यार बलुच यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना व्यक्त केला.