

आजऱ्यात शेतकऱ्यांचा
बांबू शेतीकडे वाढला कल
आजरा, जि. कोल्हापूर : आजऱ्यात शेतकऱ्यांचा बांबू शेतीकडे कल वाढला आहे. पारंपारिक माणगा (मेसकाठी) या स्थानिक बांबूच्या प्रजातीबरोबर व्यावसायिक जातींची बाबू लागवड केली जात आहे. यंदा तालुक्यात सुमारे ५० एकरांवर व्यावसायिक बांबू लागवड होणार आहे. आतापर्यंत सुमारे १५० एकरांवर व्यावसायिक दृष्टिकोनातून औद्योगिक वापराच्या विविध प्रकारच्या जातीची लागवड केली आहे.
तालुक्यात ड्रॅड्याकॅलमस ट्रोक्सी माणगा (मेसकाठी) या स्थानिक प्रजातीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे भर दिला आहे. आता अलीकडे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या अन्य बांबूच्या जातीची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
देशातील १३६ पैकी आठ जाती राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत केंद्र शासनाने व्यावसायिक लागवडीसाठी प्रमाणित केलेल्या आहेत. त्यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. राज्यात मेसकाठी (माणगा), मानवेल, काटेरी कळक (कटांग) या सर्वश्रुत जाती आहेत. राज्यभरात मेसकाठी (माणगा) या बांबूला विशेष मागणी असून, याचा वापर शेती उद्योगातील आधारासाठी केला जातो. याचबरोबर पायाड, घरबांधणी, बांधकाम, विणकाम, खाण्यासाठी कोंब, शिडी, हस्तकलेच्या व गृहोपयोगी वस्तू आदींच्या निर्मितीसाठी पारंपरिकदृष्ट्या वापर केला जातो. कर्नाटकातील संकेश्वरसह राज्यभरात अन्य भागात माणग्याची विक्री होते. बांबूसा टुल्डा, बांबूसा बल्कोवा, बांबूसा न्यूटन्स, ड्रॅड्याकॅल्मस ब्रॅण्डसी, ड्रॅड्याकॅल्मस ॲस्पर, ड्रॅड्याकॅल्मस ट्रायकस (मानवेल), व्हल्गरीस ग्रीन या आठ जातींचा समावेश होतो. यापैकी टुल्डा, बल्कोवा, ब्रॅण्डीसी या जातीच्या बांबू रोपांची मागणी शेतकरी करीत आहेत. बांबूकडे नगदी पीक म्हणून शेतकरी पाहत असून वर्षाला चांगल्या शाश्वात उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत म्हणून पुढे येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.