बारामतीत एकल वापर प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plastic

एकल वापर प्लॅस्टिकचा वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार.

बारामतीत एकल वापर प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी

बारामती - एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बारामती नगरपालिकेने घेतला असून त्यावर आता अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

यापुढील काळात एकल वापर प्लॅस्टिकचा वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार सजावटीसाठी प्लॅस्टिक व थर्मोकोल या शिवाय मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे यांची प्लॅस्टिकची आवरणे, प्लॅस्टिकच्या कँडी काड्या, आईसक्रीम कांड्या, प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी काटे चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, या सह 100 मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी आहे.

या शिवाय महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अधिसूचना 2018 अंतर्गत कंपोस्टेबल प्लॅस्टिक (कचरा व नर्सरीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, हँडल असलेल्या व नसलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, डिश, बाऊल, कंटेनर यावरही बंदी आहे.

या नियमांचे उल्लंघन करणा-यांना जागेवर पाचशे रुपये दंड तसेच संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुस-यांदा वापर केल्यास दहा हजार रुपये दंड तर तिस-यांदा वापर करताना निदर्शनास आल्यास 25 हजार रुपये दंड व तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते. नगरपालिकेने क्षेत्रीय अधिका-यांवर या बाबतची जबाबदारी दिलेली असून आरोग्य विभागाच्या अधिका-यांचे अशा प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकही निर्माण केले आहे.

दरम्यान बारामती नगरपालिकेने लुक्रो प्लॅस्टीसायकल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी प्लॅस्टिक संकलन बूथ लावण्यात येत असून नागरिकांनी घरात जमा होणारे प्लॅस्टिक त्या ठिकाणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Ban On Single Use Plastic In Baramati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BaramaticrimeBanplastic
go to top