केळीघड तोडणाऱ्या रोबोटला राष्ट्रीय मान्यता

केळीघड तोडणाऱ्या रोबोटला राष्ट्रीय मान्यता
Published on: 

केळीघड तोडणाऱ्या रोबोटच्या आरेखनाला पेटंट प्राप्त

केळी काढणीचे कष्ट होणार कमी : डॉ. संजय पाटील

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, बदनापूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे माजी पदव्युत्तर (उद्यानविद्या विभाग) विद्यार्थी लखेसिंग गिरासे आणि प्रा. पराग बागुल यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टात आणि श्रमात बचत करणारा नावीन्यपूर्ण रोबोट (रोबोटिक बनाना हार्वेस्टर) विकसित केला आहे. त्याच्या आरेखनाला भारत सरकारच्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा कार्यालयाकडून नुकतेच पेटंट मंजूर झाले आहे. तसे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

केळीच्या बागेत तयार झालेला पक्व केळीघड झाडावरून तोडून तो सुरक्षितपणे ट्रॅक्टरमध्ये ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम हा रोबोट करू शकतो. केळीघड तोडणी व वाहतुकीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, वेळ आणि शारीरिक श्रम लागतात. ते कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
कृषी यांत्रिकीकरणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि संचालक संशोधन डॉ. भगवान असेवार यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या संशोधनासाठी पेटंट प्राप्त होणे, ही अभिमानाची बाब मानली जात असून, त्या बद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
-----
केळीघड काढणाऱ्या रोबोटमधील तंत्रज्ञान व कार्यपद्धती
- कॅमेरा सेन्सर ः केळी घड ओळखण्याचे काम करेल.
- LiDAR सेन्सर ः अंतर मोजण्यासाठी आणि परिसराचा अंदाज घेण्यासाठी.
- अल्ट्रासॉनिक सेन्सर ः दरम्यानचे अडथळे ओळखण्यासाठी.
- कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत प्रणाली (एआय बेस्ड सिस्टिम) ः घडाची ओळख पटविल्यानंतर त्याची पक्वता व स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी.
- हायड्रोलिक रोबोटिक आर्म ः घडाच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी व योग्य उंची नियंत्रित करण्यासाठी.
- अॅटोमॅटिक कटिंग मेकॅनिझम ः केळीच्या घडाचा देठ कापण्यासाठी.
- सेफ्टी ग्रीपर ः घड पकडून आधार देण्यासाठी.
- ईसीयू किंवा कंट्रोलर ः सेन्सरकडून मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून यंत्र नियंत्रित करण्यासाठी.
- कलेक्शन बीन ः काढलेले घड सुरक्षित ठेवण्यासाठी.
- ट्रॅक्टर माउंटेड फ्रेम ः संपूर्ण यंत्र ट्रॅक्टरला जोडण्यासाठी.
---------------------------------------------------
फोटो सोबत रोबोटिक बनाना हार्वेस्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.