कवठेत ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान’ प्रशिक्षण संपन्न; जिल्ह्यात केळी क्षेत्रासह निर्यातीवर भर देण्याचे आवाहन

कवठेत ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान’ प्रशिक्षण संपन्न;  जिल्ह्यात केळी क्षेत्रासह निर्यातीवर भर देण्याचे आवाहन
Published on

कवठेत ‘केळी उत्पादन तंत्रज्ञान’ प्रशिक्षण

जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्रासह निर्यातीवर भर देण्याचे आवाहन

​कवठे, ता. १२ : भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), कृषी विज्ञान केंद्र (बोरगाव) आणि ‘आत्मा’ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कवठे येथील कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीत ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात झाला.

जिल्ह्यात केळी लागवड क्षेत्राचा विस्तार होत असतानाच शेतकऱ्यांनी आता केवळ उत्पादनावर न थांबता जागतिक बाजारपेठ काबीज करावी, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन केंद्राचे प्रा. रवींद्र पवार म्हणाले, ‘जिल्ह्यात केळीचे हेक्टरी उत्पादन ४० टनांपर्यंत पोहोचले असले, तरी निर्यातीचे प्रमाण अद्याप खूप कमी आहे. भारताचा जागतिक निर्यातीतील वाटा केवळ तीन टक्के आहे, जो वाढवणे काळाची गरज आहे. केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांत एक अब्ज डॉलर्सच्या केळी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाटा महत्त्वाचा ठरेल.’’
​यावेळी शेतकऱ्यांना वाण निवड, ​लागवड पद्धत, ​घड व्यवस्थापन, ​खत व्यवस्थापन, ​काढणी व प्रक्रिया, प्रमाणपत्र यांविषयी मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर, मंडल कृषी अधिकारी निखिल रायकर, विषय विशेषज्ञ भूषण यादगिरवार यांनीही मार्गदर्शन केले.
कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अतुल डेरे, बाजार समितीचे संचालक राहुल डेरे, कृषी अधिकारी कुणाल नेवसे यांच्यासह मधुकर डेरे, सुनील डेरे, सुरेश पोळ, अमोल जाधव, संतोष डेरे, भानुदास पोळ, विक्रम डेरे, भगतसिंग डेरे, विजय बाबर, राजेंद्र डेरे, प्रवीण पोळ, जितेंद्र डेरे, नितीन डेरे, रितेश डेरे, रवींद्र येवले, रामदास डेरे, गुलाब कानडे, शिवाजी डेरे, तानाजी डेरे, दादासाहेब डेरे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
------

94849
कवठे : कार्यक्रमात बाेलताना रवींद्र पवार.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com