
Bandu Andekar
Esakal
पुणे - गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून तब्बल १२ वर्षे प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या कुख्यात सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीवर फरासखाना पोलिसांनी संघटितरीत्या खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यात आंदेकर कुटुंबातील एका महिलेचाही समावेश आहे.