
पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न गंभीर असल्याने यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली होती. मात्र, यामधील तब्बल ३८.५० कोटी रुपयांची तरतूद बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील माननीयांना खूष करण्यासाठी वळविण्यात आली आहे. या निधी पळवापळवीचा फटका बाणेर बालेवाडीपेक्षा कमी विकसित असलेल्या भागाला बसणार आहे.