Balewadi: पदपथावर अनधिकृत व्यवसाय, पार्किंग; बाणेरमध्ये अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर; प्रशासनावर दिखाऊ कारवाईचा आरोप

Encroachments Increase on Baner Footpaths: बाणेर परिसरातील पदपथांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. फेरीवाले, हातगाड्या आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.
Balewadi

Balewadi

esakal

Updated on

बालेवाडी: राधा चौकाकडून बाणेरकडे जाताना येणाऱ्या पीएमपी बस डेपोसमोरील पदपथ सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून पादचाऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पदपथावर फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण, हातगाड्यांची रांग, दुचाकींचे अनधिकृत पार्किंग आणि पदपथावर मांडलेले विक्रीचे साहित्य, यामुळे पदपथ पूर्णपणे व्यापला जात असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com